भाग्यनगर येथे पकडण्यात आलेले आतंकवादी करत होते मुसलमान तरुणांची भरती !
भाग्यनगर (तेलंगाणा) – गेल्या वर्षी ऑक्टोबर मासात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अब्दुल जाहिद, माज हसन फारूक आणि समीउद्दीन या ३ आतंकवाद्यांना अटक केली होती. त्यांच्यावर नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये म्हटले आहे की, अब्दुल जाहिद हा आतंकवादी लष्कर-ए-तोयबा आणि इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनांच्या संपर्कात होता. पाकमधील त्याला आदेश देणार्यांच्या सांगण्यावरून तो मुसलमान तरुणांची संघटनेत भरती करत होता. हे तरुण आतंकवादी कारावाया करत होते.
NIA की FIR से पाकिस्तान की साजिश का खुलासा हुआ है. पढ़ें पूरी खबर #NIA #Pakistan #Terrorists https://t.co/efhuXoGBba
— ABP News (@ABPNews) February 5, 2023
जाहिद याच्या घरातून २ हातबाँब आणि ४ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. जाहिद याने वर्ष २००२ मध्ये भाग्यनगरच्या दिलसुखनगरातील श्री साईबाबा मंदिर, वर्ष २००४ में सिकंदराबाद येथील श्री गणेश मंदिर आणि वर्ष २००५ मध्ये बेगमपेट येथील पोलिसांचे कार्यालय यांवर आक्रमण केले होते.
भारतात करणार होते ‘लोन वुल्फ अटॅक’ !
(लोन वुल्फ अटॅक म्हणजे एकट्याने करायचे आक्रमण)
पाकिस्तान या आतंकवाद्यांच्या साहाय्याने भारतात ‘लोन वुल्फ अटॅक’ करणार होता. त्यासाठी वलयांकित व्यक्ती किंवा नेते यांना लक्ष्य करण्यात येणार होते.
संपादकीय भूमिका‘आतंकवाद्यांना धर्म असतो’, हे आता संपूर्ण जगाला पटले आहे. त्यामुळे आता हा धार्मिक आतंकवाद नष्ट करण्यासाठी धर्मांधांची जिहादी मानसिकता कशी नष्ट करता येईल, याचा विचार करून त्यावर कृती करणे आवश्यक आहे ! |