केंद्रशासनाकडून २३० चिनी ॲप्सवर बंदी
नवी देहली – केंद्रशासनाने चीनच्या २३० ॲप्सवर बंदी घातली आहे. यातील १३८ ॲप्स ही जुगाराच्या संदर्भातील आहेत, तर ९४ ॲप्स कर्ज उपलब्ध करण्याविषयीची आहेत. गृह मंत्रालयाने या संदर्भात आदेश दिला आहे.
भारत में फिर चीन से संबंधित हानिकारक ऐप्स को प्रतिबंध किया जा रहा है. इमरजेंसी और अर्जेंट आधार पर सट्टा लगाने वाले 138 ऐप्स और लोन देने वाली 94 ऐप्स को बैन और ब्लॉक करने का प्रोसेस शुरू किया.#ChinaAppBan #DigitalStrike https://t.co/DC7X2BMEYI
— ABP News (@ABPNews) February 5, 2023
१. सरकारने ६ मासांत २८८ चिनी ॲप्सची चौकशी केली होती. त्यात लक्षात आले होते की, हे ॲप्स भारतियांची वैयक्तिक माहिती चोरी करत आहेत. त्यानंतर सरकारने यातील २३० ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ अंतर्गत ही बंदी घालण्यात आली आहे.
२. कर्ज देणारे चिनी ॲप्स भारतियांना अल्प व्याजाने कर्ज देत आणि नंतर त्यांच्याकडून अधिक व्याज उकळत होते. व्याज वसूल करण्यासाठी त्यांचा छळ केला जात होता. त्यामुळे तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश राज्यांत काही जणांनी आत्महत्याही केल्याच्या घटना घडल्या होत्या.