संभाजीनगर येथील घोटाळ्यातील धर्मांधाला ४ वर्षांनंतर बेंगळुरू येथून अटक !
संभाजीनगर – एकूण ७५ लोकांना २ कोटी रुपयांचा गंडा घालणार्या ‘रिदास इंडिया’ आस्थापनाच्या संचालकाला ४ वर्षांनंतर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बेंगळुरू येथून अटक केली आहे. महंमद आयमन (वय २४ वर्षे, रा. बेंगळुरू) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या आरोपीने दामदुपटीचे आमीष दाखवून ७५ लोकांना २ कोटी २२ लाख रुपयांचा गंडा घातला होता; मात्र गुन्हा नोंद झाल्यावर तो गेल्या ४ वर्षांपासून सतत पोलिसांच्या हातावर तुरी देत होता.
#Aurangabad : गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी गेल्या चार वर्षांपासून सतत पोलिसांच्या हातावर तुरी देत होता.https://t.co/S9ZCgFFzY4
— ABP माझा (@abpmajhatv) February 4, 2023
शहरात वर्ष २०१७ ते २०१९ या काळात गरिबांना आरोपीने लुबाडले आहे. दुसरा आरोपी महंमद आयुब हुसैन हा मयत झाला आहे, असे पोलिसांनी सांगितले.