(म्हणे) ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’तील प्रक्षोभक भाषणांवर कारवाई करा !’ – हुसेन दलवाई, माजी खासदार
मुंबई, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – मुंबई येथे २९ जानेवारी या दिवशी ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’च्या फेरीत द्वेषपूर्ण आणि भडकावणारी भाषणे करून खोटी माहिती अन् अफवा पसरवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या मोर्च्याला मुंबई पोलिसांनी अनुमती दिलीच कशी ? असा प्रश्न विचारत भडकाऊ भाषण करून समाजात द्वेष निर्माण करणार्यांवर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मुक्ताफळे काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी ४ फेब्रुवारी या दिवशी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उधळली आहेत.
हुसेन दलवाई यांनी या पत्रात म्हटले आहे की,
१. ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’च्या नेतृत्वाखाली कार्यक्रम आयोजन करण्यामागे सकल हिंदु समाज आणि त्यांच्या घटक संघटना हे काम करत असतात. मुंबई येथील दादर मधील मोर्च्यामध्ये राज्यातील आमदार, खासदार आणि बाहेरून आलेले आमदार यांनी भाग घेऊन समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला. (धर्मांधांनी काढलेल्या मोर्च्यात मुसलमान खासदार, आमदार आणि मंत्री सहभागी होतात, त्या वेळी दलवाई मूग गिळून गप्प बसतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) समाजात इतका द्वेष पसरवणारे कार्यक्रम त्वरित रोखणे आवश्यक आहे.
२. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन समाजात द्वेष पसरवल्यामुळे त्यांचीही अपर्कीती केली जात आहे. हे सर्व दिसत असतांना मुंबई पोलिसांनी मात्र मोर्च्याला अनुमती देऊन बघ्याची भूमिका घेतली. (नियमानुसार अनुमती देणार्या मुंबई पोलिसांपेक्षा दलवाई स्वतःला मोठे समजतात का ? – संपादक)
३. महाराष्ट्राची परंपरा सर्वांना समवेत घेऊन चालण्याची आहे. त्या परंपरेला तडा जाणारी ही गोष्ट असून यावर तात्काळ कारवाई करण्याची आवश्यकता आहे. (हिंदु परंपरा आणि सण साजरे करतांना हिंदूंवर धर्मांधांकडून अत्याचार होत असतांना दलवाई यांना परंपरा दिसत नाही का ? त्या वेळी हिंदूंच्या पाठीशी उभे राहून ते धर्मांधांना का विरोध करत नाहीत ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|