कफाच्या विकारांवर उपयुक्त सनातन शुंठी (सुंठ) चूर्ण
सनातनची आयुर्वेदाची औषधे
‘हिवाळा संपून उन्हाळा चालू होईपर्यंच्या मधल्या काळात सर्दी, खोकला, दमा यांसारखे कफाचे विकार वाढतात.
थंडी पडणे न्यून झाल्यावर साधारण १५ दिवस प्रतिदिन सकाळी आणि सायंकाळी पाव चमचा सनातन शुंठी (सुंठ) चूर्ण पाव चमचा मधात किंवा अर्धी वाटी कोमट पाण्यात मिसळून घ्यावे किंवा चहा किंवा कशाय यांमध्ये चवीनुसार सनातन शुंठी (सुंठ) चूर्ण घालून उकळून प्यावे. (मापासाठी चहाचा चमचा वापरावा.) असे केल्याने कफाचे विकार आटोक्यात रहाण्यास साहाय्य होते.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०२३)