चरणसेवा आणि तपश्चर्या यांतील भेद समजणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ३ वर्षे) !
१. पू. वामन यांना ‘त्यांच्या जन्मापूर्वी ते नारायणांकडे तपश्चर्या करत होते’, असे सांगितल्यावर त्यांनी ‘मी नारायणांची चरणसेवा करत होतो’, असे वडिलांना सांगणे
‘२३.४.२०२२ या दिवशी आम्ही कु. श्रियाच्या लहानपणाविषयी बोलत होतो. तेव्हा पू. वामन यांनी मला विचारले, ‘‘आई, तेव्हा मी कुठे होतो ?’’ मी म्हणाले, ‘‘तेव्हा तुम्ही नारायणांकडे होता.’’ माझे यजमान श्री. अनिरुद्ध पू. वामन यांना म्हणाले, ‘‘तेव्हा तुम्ही नारायणांकडे तपश्चर्या करत होतात.’’ त्यावर पू. वामन वडिलांना म्हणाले, ‘‘मी नारायणांकडे तपश्चर्या करत नव्हतो. मी त्यांची चरणसेवा करत होतो, म्हणजे त्यांचे चरण चेपून देत होतो.’’
२. पू. वामन यांना चरणसेवा आणि तपश्चर्या यांतील भेद समजणे अन् त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव लक्षात येणे
पू. वामन यांना चरणसेवा आणि तपश्चर्या यांतील भेद समजतो. तसेच त्यातून त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला शरणागतभाव लक्षात येतो. ‘मी तपश्चर्या करत होतो’, असे म्हणण्यात काही अंशी तरी अहंभाव असतो. ‘आपण गुुरूंच्या समोर अखंड शिष्य भावातच असायला पाहिजे’, हेही यातून पू. वामन यांनी आम्हाला सहजतेने शिकवले. ‘इतक्या लहान वयात पू. वामन यांना चरणसेवा म्हणजे काय ? आणि त्याचा भावार्थ शब्दात सामान्य भाषेत सांगता येतो’, हेच त्यांच्यातील संतत्वाचे दर्शन आहे. मोठ्यांनाही असे उत्तर द्यायला सुचणार नाही.
३. कृतज्ञता
‘संतांचे संतत्व लहान कृती आणि विचार यांतून प्रकट होते’, याची अनुभूती आम्हाला केवळ गुरुकृपेने अनुभवता आली. परात्पर गुरु डॉ. आठवले ही केवळ आपलीच कृपा आहे; म्हणून प्रत्येक क्षणी आपल्या संकल्पाने जनलोकातून पृथ्वीवर जन्म घेेतलेल्या अद्वितीय जिवाची अनुभूती आम्ही अनुभवत आहोत. यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. ‘आपल्या चरणी अखंड कृतज्ञताभावात रहाणे’, हीच खरी कृतज्ञता !’
– सौ. मानसी राजंदेकर (पू. वामन यांच्या आई, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), फोंडा, गोवा. (१२.५.२०२२)