सनातन हा देशाचा राष्ट्रीय धर्म ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
नवी देहली – सनातन हा देशाचा राष्ट्रीय धर्म आहे. हिंदूंना काही केले, तर जादूटोण्याच्या गोष्टी केल्या जातात; मात्र अन्य पंथियांनी असाच प्रकार केला, तर कुणी प्रश्न उपस्थित करत नाही, असे विधान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज तक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.
‘सनातन धर्म भारत का राष्ट्रीय धर्म है,’ आजतक से बोले सीएम योगी आदित्यनाथ | @myogiadityanath | #Yogi
— AajTak (@aajtak) February 3, 2023
मध्यप्रदेशातील बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपावरून योगी आदित्यनाथ बोलत होते. ‘सनातन धर्माची मुळे इतकी खोल आहेत की, कुणी त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.