गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्याला फाशीची शिक्षा !
अवघ्या २ मासांत लागला निकाल !
गाजियाबाद (उत्तरप्रदेश) – ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी न्यायालयाने २० वर्षांच्या सोनू गुप्ता याला फाशीची शिक्षा सुनावली, तसेच २० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला. १ डिसेंबर २०२२ या दिवशी ही घटना घडली होती. अवघ्या २ मासांत या गुन्ह्याचा निकाल लागला आहे. घराबाहेर खेळत असतांना सोनू याने या मुलीचे अपहरण करून तिला जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता आणि नंतर गळा दाबून तिची हत्या केली होती.
छात्रा का पीछा करते समय दिखी बच्ची तो कर दी रेप के बाद हत्या, 65वें दिन पहुंचा मौत के मुंह में #GhaziabadCourthttps://t.co/aWQdiUtU8p
— Zee Delhi-NCR Haryana (@ZeeDNHNews) February 4, 2023
संपादकीय भूमिकाअशा घटनांत अशीच आणि इतक्याच जलद गतीने शिक्षा होत राहिली, तर गुन्हेगारांना गुन्हा करण्यापूर्वी विचार करावा लागेल ! |