श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे !
तुळजापूर (धाराशिव) – ‘आर्ट ऑफ लिव्हींग’चे संस्थापक धर्मगुरु श्री श्री रविशंकर यांच्या ‘जागर भक्तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी श्री श्री रविशंकर यांच्याविरोधात घोषणा दिल्या. श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानावरून संभाजी ब्रिगेडने आंदोलनाची चेतावणी दिली होती. या कार्यक्रमाच्या वेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. तरीही काही कार्यकर्त्यांनी श्री श्री रविशंकर यांना काळे झेंडे दाखवत घोषणा दिल्या. या प्रकारानंतर पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्यांना कह्यात घेतले.