श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ‘श्री सिद्धिविनायका’ला अभिषेक करत असतांना त्यांच्या ठिकाणी देवीचे दर्शन होऊन भावजागृती होणे
‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’तील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि अधिवेशनाची पूर्ण फलनिष्पत्ती मिळावी’, यासाठी ‘८.६.२०२२ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते श्री सिद्धिविनायक देवतेवर अभिषेक करण्यात आला. त्या वेळी मला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या ठिकाणी साक्षात् देवीचे दर्शन झाले. त्या वेळी मला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे हात गुलाबी रंगाचे दिसत होते आणि चेहरा तेजस्वी दिसत होता. त्यांना पाहून माझे मन एकदम एकाग्र झाले. अभिषेक संपेपर्यंत माझा ‘श्री सिद्धिविनायकाय नमः ।’ असा नामजप चालू होता. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना प्रत्यक्ष पाहून मला पुष्कळ आनंद झाला आणि माझी भावजागृती झाली. त्या वेळी ‘आता काही नको, कृतज्ञताभावातच रहावे’, असे मला वाटत होते.’
– कु. जिगिषा दर्शन म्हापसेकर (जिगिषा म्हणजे महत्त्वाकांक्षा) (वय १७ वर्षे), सिंधुदुर्ग (१९.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |