श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासाठी अल्पाहार बनवतांना ‘श्री अन्नपूर्णादेवी साहाय्य करत आहे’, असे जाणवणे
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ सध्या सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात आल्या आहेत. श्री गुरुकृपेने मला त्यांच्यासाठी अल्पाहार बनवण्याची सेवा मिळाली. ही सेवा करतांना मला पुढील सूत्रे जाणवली.
१. अल्पाहार बनवतांना हलकेपणा जाणवून सेवा अल्प वेळेत होणे
मी अल्पाहार बनवत असतांना ‘माझी सेवा अगदी अल्प वेळेत आणि अतिशय सहजतेने होत आहे’, असे मला जाणवले. ‘एखादी कृती मी करत आहे’, असे मला जाणवत नव्हते, तर ती कृती सहजतेने होत होती. सेवा करतांना मला पुष्कळ हलकेपणा जाणवत होता. एरव्ही स्वयंपाकातील एखादा पदार्थ करतांना पूर्वसिद्धता करणे आणि प्रत्यक्ष कृती करणे यांसाठी अधिक वेळ लागतो; परंतु श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंसाठी अल्पाहार बनवतांना सेवा सहज, अल्प वेळेत आणि सतत नामजप करत झाली.
२. अल्पाहार बनवण्याची सेवा करतांना ‘श्री अन्नपूर्णादेवी मला साहाय्य करत आहे आणि माझ्याकडून सेवा करवून घेत आहे’, असे मला जाणवत होते.
कृतज्ञता
देवीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यासाठी अल्पाहार बनवण्याची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल मला कृतज्ञता वाटत होती. हे गुरुमाते, मला ही सेवा देऊन त्यातून आनंद दिल्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. विद्या विलास गरुड, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |