अमृतसरजवळ सैनिकांनी पाडले पाकिस्तानी ड्रोन !
अमृतसर (पंजाब) – येथील रेअर कक्कर भागात मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानकडून आलेले ड्रोन भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी गोळीबार करून खाली पाडले.
सौजन्य: TIMES NOW Navbharat
सीमारेषेवरील भारताच्या बाजूच्या तारेच्या कुंपणाजवळ ते पडले. त्याला लावण्यात आलेल्या काही संशयित वस्तू आढळल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाकडून देण्यात आली असून त्याची तपासणी केली जात आहे.