हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखांवर ‘ईडी’ची धाड !
कोल्हापूर – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) १ फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखांवर धाडी टाकल्या. बँकेच्या शाखांमध्ये ‘ईडी’चे पथक दाखल झाल्यावर आता अन्य कुणासही जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.
(सौजन्य : News18 Lokmat)
‘गोडसाखर’ साखर कारखान्यामध्ये अवैध १०० कोटी रुपयांची गुंतवणूक असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे. गेल्या मासात कारखान्याशी संबंधित एका आस्थापनावर पुणे येथे धाड टाकली होती, तसेच ११ जानेवारीला हसन मुश्रीफ यांचे कागल, पुणे येथील निवासस्थान यांच्यावरही धाड टाकण्यात आली होती.