अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याचा आरोप !
नगर – अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिम याच्यासमवेत संबंध आहेत, असा आरोप त्यांचे माजी स्वीय साहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी २ फेब्रुवारी या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. दाऊद इब्राहिम याचे दीपाली सय्यद यांचे दाऊदशी अनेक वेळा दूरभाषवरून संभाषण झाले आहे, तसेच दाऊद याची पत्नी मेहजबिन हिच्याशीही दीपाली सय्यद यांचे संभाषण झाले आहे, असा दावा शिंदे यांनी या वेळी केला.