गुवाहाटी बंडाच्या वेळी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी दूरभाषवरून आशीर्वाद दिला होता !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट !
जालना – गुवाहाटी बंडाच्या वेळी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी आम्हाला आशीर्वाद दिला होता, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २ फेब्रुवारी या दिवशी येथे केला. या वेळी व्यासपिठावर ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो, तेव्हा गुरुदेवांनी मला दूरभाषवर आशीर्वाद दिला होता. ‘आम्ही एक लढाई चालू केलेली आहे’, असे त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले होते, ‘‘चांगले आहे. चांगले काम करत रहा. यशस्वी व्हा.’’ गुरुदेव आम्हाला चांगला उपदेश देतील, आमचे सरकार त्याचा सन्मान करील.’’
CM Shinde on Sri Sri Ravi Shankar : मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला गुवाहाटीतील ‘त्या’ फोनकॉलचा प्रसंग!https://t.co/2jrmCKw8Ui #Maharashtra #Guwahati #EknathShinde #SriSriRaviShankar pic.twitter.com/7U06EmFkeI
— LoksattaLive (@LoksattaLive) February 2, 2023
श्री श्री रविशंकर म्हणाले, ‘‘पूर्वी जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवारचे काम केले. तेव्हा ते म्हणाले होते की, आमचे ७० टक्के काम हे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ स्वयंसेवकांच्या माध्यमातून झाले आहे. स्वयंसेवक जेव्हा एखादे काम हाती घेतात, तेव्हा ते यशस्वी होते; कारण ते दैवाश्रय आणि राजाश्रय समवेत घेऊन चालतात.’’