‘हिंदु मक्कल कत्छी’ (हिंदु जनता पक्ष)च्या वतीने कुड्डालोर (तमिळनाडू) येथे आयोजित ‘सनातन हिंदु धर्मसभे’त हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
कुड्डालोर (तमिळनाडू) – ‘हिंदु मक्कल कच्छी’च्या वतीने २८ ते २९ जानेवारी या कालावधीत येथे विशाल सनातन हिंदु धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग होता. या सभेत अनेक मठ प्रमुख, संन्यासी, तसेच हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. यात महिलांची विशेष उपस्थिती होती. ‘हिंदु मक्कल कत्छी’चे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांनी या सर्व कार्यक्रमांचे संयोजन केले. या परिषदेला माम्बलम्च्या नगरसेविका उमा आनंदन् आणि हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन या सन्माननीय अतिथी होत्या.
तमिळनाडू पोलिसांकडून ग्रंथ आणि लेखक यांची चौकशीएक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांनी ग्रंथाच्या लेखकांची चौकशी केली. तसेच त्यांनी पुस्तक आणि त्यातील लिखाणाची छायाचित्रे काढली. (तमिळनाडू पोलिसांनी अशा प्रकारची चौकशी धर्मांध आणि जिहादी यांची केली असती, तर एव्हाना देश ‘आतंकवादमुक्त’ झाला असता ! – संपादक) |
या प्रसंगी अखिल भारतीय संन्यासी संगमचे प्रमुख रामानंद स्वामी, भाजपचे नेते श्री. एच्. राजा आणि नगरसेवक उमा आनंदन् यांना इंग्रजी भाषेतील ‘हलाल जिहाद ?’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. या सभेच्या ठिकाणी हलाल अर्थव्यवस्थेशी संबंधित तमिळ भाषेतील पत्रकांचे वाटप करण्यात आले.