प्रगत प्रथमोपचार शिबिरात सोलापूर येथील आधुनिक वैद्या सुषमा कमलाकर महामुनी यांना आलेल्या अनुभूती
‘१२ ते १५.९.२०२२ या कालावधीत रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात प्रगत प्रथमोपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या आदल्या दिवशी म्हणजे ११.९.२०२२ या दिवशी शिबिरामध्ये श्री. महावीर श्रीश्रीमाळ यांनी भावप्रयोग घेतले. त्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. ‘वैकुंठ, वैकुंठ’ असा नामजप केल्यावर ‘मी वैकुंठात असून भावविभोर होऊन हातांत टाळ अन् चिपळ्या घेऊन देहभान हरपून नाचत आणि साष्टांग दंडवत घालत आहे’, असे मला वाटत होते.
२. ‘रामनाथी रामनाथी’ असा नामजप करतांना प्रथम सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्या डोळ्यांसमोर आले. नंतर मला आश्रमाचा दर्शनी भाग दिसू लागला.
३. वरील दोन्ही नामजपांपैकी ‘वैकुंठ, वैकुंठ’ या नामजपाशी मी एकरूप झाले’, असे मला वाटले.
या अनुभूती दिल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– आधुनिक वैद्या सुषमा कमलाकर महामुनी, सोलापूर (१२.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |