सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनातील अनमोल सूत्रे
१. ‘अध्यात्म हे कीर्तन किंवा प्रवचन यांच्याप्रमाणे तात्त्विक नाही, तर कृतीचे शास्त्र आहे. त्यामुळे पूजा करतांना, म्हणजे साधना करतांना ‘मन भटकत असणे’, हे साधनेसाठी योग्य नाही.
२. आपल्यामध्ये साधनेची तळमळ असली की, देव आपल्यासाठी सर्वकाही करतो !
३. ‘आपल्या मनाप्रमाणे व्हायला हवे’, हे अहंयुक्त विचार जाण्यासाठी ‘सनातन संस्थे’मध्ये काही साधकांना त्यांचे मूळ कौशल्य नसलेल्या सेवा करायला सांगतो, उदा. एखाद्या डॉक्टरांना वैद्यकीय सेवा सांगण्याऐवजी अन्य सेवा करायला सांगतो.
४. सध्या आपत्काळ सूक्ष्मातून आला असल्याने साधकांच्या मनात नकारार्थी विचार येतात आणि बर्याच साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास वाढत आहेत. त्यामुळे आध्यात्मिक स्तरावरील उपाय करतांना आपला देव किंवा गुरु यांच्याप्रतीचा भाव वाढवायला हवा. सध्या त्रास वाढणार आहेत; पण आपण जिंकणार आहोत.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले