बांगलादेशात वर्ष २०२२ मध्ये १५४ हिंदूंच्या हत्या !
हिंदूंची ८ सहस्र ९९० एकर भूमी इस्लामवाद्यांनी बळकावली !
नवी देहली – मुसलमानबहुल बांगलादेशात हिंदूंवरील आघात दिवसेंदिवस चालूच आहेत. वर्ष २०२२ मध्ये बांगलादेशात १५४ हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या, तर ६६ हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले, अशी माहिती ‘पांचजन्य’ या नियतकालिकाने ट्वीट करून दिली आहे.
बांग्लादेश में हिंदुओं पर अत्याचार !!
2022 में 66 हिंदू महिलाओं का रेप।
154 की हत्या , 333 को बीफ खाने के लिए किया मजबूर।
2022 में हिंदू परिवारों की 8990 एकड़ जमीन इस्लामवादियों ने हड़प ली।
128 हिंदू मंदिरों में आग लगा दी गई।
481 हिंदू देवी-देवताओं की तोड़ी मूर्तियां।
— Panchjanya (@epanchjanya) February 2, 2023
यात म्हटले आहे की, वर्ष २०२२ मध्ये बांगलादेशात हिंदूंची ८ सहस्र ९९० एकर भूमी इस्लामवाद्यांकडून बळकावण्यात आली. १२८ मंदिरांना आग लावण्यात आली, तर देवतांच्या ४८१ मूर्तींची तोडफोड करण्यात आली. ३३३ हिंदूंना बलपूर्वक गोमांस खाण्यास बाध्य करण्यात आले.
संपादकीय भूमिका
|