हिंडेनबर्गच्या अहवालावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित

नवी देहली – अमेरिकेतील हिंडेनबर्ग या संस्थेने भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या उद्योगाच्या विरोधात दिलेल्या अहवालावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात २ फेब्रुवारी या दिवशी विरोधकांनी गदारोळ केला. यामुळे समागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर कामकाज चालू झाल्यावर पुन्हा गदारोळ झाल्याने कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. या अहवालावरून संसदीय चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली.

संपादकीय भूमिका 

लाखो रुपये व्यय (खर्च) करून चालवण्यात येणारे संसदेचे कामकाज अशा प्रकारे गदारोळ करून बंद पाडणार्‍यांकडून हा पैसा वसूल करण्याची आणि अशांची खासदारकी रहित करण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे !