जगामध्ये ‘सनातन’ हाच एकमेव धर्म, तर उर्वरित सर्व पंथ !
बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची स्पष्टोक्ती !
नवी देहली – भारत आधीपासूनच हिंदु राष्ट्र आहे. हिंदु राष्ट्राचा अर्थ म्हणजे हिंसामुक्त राष्ट्र, असे विधान मध्यप्रदेशातील बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. ‘संपूर्ण जगामध्ये ‘सनातन’ हाच एकमेव धर्म आहे, तर उर्वरित सर्व पंथ आहेत’, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
सौजन्य: IndiaTV
१. सनातन धर्मावर प्रश्न उपस्थित करणार्यांना बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले की, त्यांना अन्य पंथांमधील अंधश्रद्धा दिसत नाही. वडिलांना वडील म्हणणे अंधश्रद्धा आहे, तर याहून मोठा अंधश्रद्धाळू अन्य कुणी असू शकत नाही.
२. ‘श्रीरामचरितमानस’वर बंदी घालणार्यांविषयी धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले की, असे लोक समाजासाठी कर्करोगाहून अधिक धोकादायक आहेत. अशांना भारतात रहाण्याचा अधिकार नाही. त्यांनी पारपत्र सिद्ध करून ठेवावे. लोकांनी त्यांना भारताबाहेर पाठवून द्यावे. उत्तर कोरियातील हुकूमशाह किम जोंग याने कोरोनाशी लढण्यासाठी जे उपाय केले, तसेच अशांच्या संदर्भात केले पाहिजेत.