३३ कोटी ६० लाख रुपयांचे कोकेन बाळगणार्या प्रवाशास अटक !
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रकार
मुंबई – येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर विभागाने आदीदी अबाबाहून आलेल्या भारतीय प्रवाशाकडून ३३ कोटी ६० लाख रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. त्याने ३.३६ किलो ड्रग्ज कोकेन लपवून आणले होते. संशय आल्याने प्रवाशाच्या सामानाची झडती घेतल्यावर अधिकार्यांना एक साबण सापडला. साबण घासल्यावर आत साबणासारखाच एक तुकडा दिसला; पण तो साबण नसून कोकेन असल्याचे समजले. या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
साबुन की शक्ल में कोकीन! मुंबई एयरपोर्ट में जब्त 33.60 करोड़ का ड्रग्स#MumbaiNews #DrugsSeizedhttps://t.co/fDFdzS7SxT
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) February 1, 2023
संपादकीय भूमिकाअशांना कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! |