धुळे येथे अनधिकृत द्रवरूप खतांचा साठा जप्त !
विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाची कारवाई !
नाशिक – राज्यात सध्या रब्बी हंगामातील कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अनधिकृत खतांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून या माध्यमातून शेतकर्यांची फसवणूक केली जात आहे. याविषयी येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाला माहिती मिळाली. त्यानंतर गुणवत्ता नियंत्रण विभागाने धुळे जिल्ह्यातील बेहेड येथे अनधिकृत आणि विनापरवाना असलेल्या द्रवरूप खत विक्री केंद्रावर ३१ जानेवारी या दिवशी धाड टाकली. या वेळी अनधिकृत आणि विनापरवाना खतांचा १८ सहस्र रुपये किमतीचा ६० लिटर साठा जप्त केला आहे.
संपादकीय भूमिकाकृषी क्षेत्रात फसवणूक करणार्या संबंधित दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी ! |