वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या ३ सहस्र ६६८ वाहनांवर कारवाई
ए.पी.एम्.सी. वाहतूक पोलीस विभागाचा प्रयत्न !
नवी मुंबई, १ फेब्रुवारी (वार्ता.) – ए.पी.एम्.सी. वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने मागील दीड मासात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या ३ सहस्र ६६८ वाहनांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी दिली.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वांत मोठी म्हणवली जाणारी बाजारपेठ ए.पी.एम्.सी. वाहतूक पोलीस शाखेच्या हद्दीमध्ये आहे.
आतापर्यंत तेथे १ सहस्र २७६ वाहनांवर ‘नो पार्किंग’ची कारवाई करण्यात आली, तसेच अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या २ सहस्र ३९२ वाहनांवरही कारवाई केली आहे. रिक्शाचालक आणि मालक यांच्या बैठका घेऊन वाहतूक नियमांचे पालन करण्याविषयी त्यांनाही मार्गदर्शन करण्यात आले.
संपादकीय भूमिकाआतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम ! |