गुजरातमधील ‘हिंदु सेने’च्या वतीने हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव !
जामनगर (गुजरात) – लव्ह जिहाद, भूमी (लँड) जिहाद, धर्मांतर आणि हलाल जिहाद यांसारख्या समस्यांच्या विरोधात गुजरात राज्यात सक्रीय असलेल्या ‘हिंदु सेने’कडून निःस्वार्थीपणे राष्ट्र-धर्मकार्य करत असलेल्या हिंदु जनजागृती समितीचा सत्कार करण्यात आला.
हिंदु सेनेचे गुजरात प्रमुख श्री. प्रतिक भट आणि अन्य पदाधिकारी यांच्या वतीने समितीचे पश्चिम महाराष्ट्र, गोवा अन् गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये, तसेच समितीचे अन्य कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी श्री. प्रतिक भट यांनी ‘हिंदु जनजागृती समितीच्या हलाल जिहाद विरोध आणि हिंदु राष्ट्र स्थापना यांच्या कार्यात संघटितपणे संपूर्ण सहभागी होऊ’, असा मनोदय व्यक्त केला.