नाशिक येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्या युवतीला गर्भवती करून धर्मांध प्रियकर पसार !
धर्मांध प्रियकरासह आई आणि भाऊ यांच्या विरोधात गुन्हा नोंद !
नाशिक – प्रेमसंबंधानंतर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मुंबई येथे रहात असलेल्या २१ वर्षीय तरुणीला विवाहाचे आमीष देत आणि तिला गरोदर करून धर्मांध प्रियकर पसार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित प्रियकर आबिद सदरुद्दीन कोकणी, त्याची आई आणि भाऊ यांच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक)
पीडितेची आई मृत झाल्यावर वडिलांनी दुसरा विवाह केला. त्यामुळे पीडिता मावशीकडे पुणे येथे रहाते. इयत्ता १२ वी शिकलेली तरुणी २ वर्षांपासून मुलींच्या वसतीगृहात वास्तव्य करत खासगी नोकरी करते. येथे तिची आरोपी कोकणी याच्याशी ओळख झाली. दोघांनी विवाह करण्याचे ठरवल्यानंतर संशयिताने खडावली (ठाणे) येथे भाड्याने खोली घेतली. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होते. प्रियकराने बळजोरीने अंबड परिसरातील एका खासगी रुग्णालयात तरुणीच्या इच्छेविरुद्ध कुठल्याही कागदपत्रावर स्वाक्षरी न घेता गर्भपात केला.
संपादकीय भूमिका
|