मुंबई उच्च न्यायालयाने अधिवक्ता सुरेंद्र गडलिंग यांचा जामीन अर्ज फेटाळला !
गडचिरोली येथील ७८ वाहनांच्या अग्नीकांडात सहभाग असल्याचा आरोप
गडचिरोली – येथील ७८ वाहनांच्या अग्नीकांडामागे हात असल्याचा आरोप असलेले अधिवक्ता सुरेंद्र गडलिंग यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने ३१ जानेवारी या दिवशी फेटाळला. याआधी सत्र न्यायालयानेही अधिवक्ता गडलिंग यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात सुरजागड लोहखनिज खाणीजवळ २५ डिसेंबर २०१६ या दिवशी झालेल्या अग्नीकांडात अधिवक्ता गडलिंग यांचा पडद्यामागचा सहभाग असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
गडचिरोलीतील अग्नीकांडात सहभाग असल्याचा आरोप ; हायकोर्टाने अॅड. सुरेंद्र गडलिंग यांचा जामीन अर्ज फेटाळलाhttps://t.co/2GUokr69BI#nagpurNews #abpnagpur
— ABP माझा (@abpmajhatv) January 31, 2023
१. सूरजागड लोह खदान परिसरात कच्च्या मालाची वाहतूक करणार्या ट्रकसह एकूण ७८ वाहने नक्षलवाद्यांनी जाळली, तसेच वाहनचालक, त्यांचे साहाय्यक आणि कामगार यांना काठ्यांनी मारहाण केली होती. त्यांच्या अंगावर डिझेल टाकून जाळून ठार मारण्याची धमकी दिली.
२. या प्रकरणात इतर आरोपींसह अधिवक्ता सुरेंद्र गडलिंग यांच्याविरुद्ध ‘अवैध कारवाया प्रतिबंध कायद्यां’तर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
३. या प्रकरणात जामीन मिळावा, यासाठी अधिवक्ता गडलिंग यांनी नागपूर खंडपिठासमोर जामीन अर्ज प्रविष्ट केला होता. त्यावर सुनावणी करतांना न्यायालयाने वरील निर्णय दिला. अधिवक्ता सुरेंद्र गडलिंग हे वर्ष २०१८ ची ‘एल्गार परिषद’ आणि त्या वेळी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीच्या प्रकरणातही आरोपी आहेत.