मध्यप्रदेशात मंदिराजवळील दारूच्या दुकानांचे गोशाळेत रूपांतर करणार !
भाजपच्या नेत्या उमा भारती यांचा आक्रमक पवित्रा
भोपाळ (मध्यप्रदेश) – येथून ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या निवारी जिल्ह्यातील ओरछा येथे प्रसिद्ध राम राजा सरकार मंदिराजवळ दारूचे दुकान उघडण्यात आले आहे. मी राज्य सरकारच्या मद्य धोरणाची वाट पहाणार नाही, तर नियमांचे उल्लंघन करून चालवणार्या दारूच्या दुकानांचे गोशाळेत रूपांतर करणे चालू करणार आहे, असा आक्रमक पवित्रा भाजपच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी घेतला.
मध्य प्रदेश में मधुशाला को गौशाला बना देंगी उमा भारती, किया बड़ा ऐलान#UmaBharti #MadhyaPradesh @umasribharti https://t.co/cB2Pp4yREL
— DNA Hindi (@DnaHindi) February 1, 2023
उमा भारती पुढे म्हणाल्या की, प्रभु श्रीरामाच्या नावाने सरकारे बनवली जात आहेत; पण रामराजा मंदिराजवळ दारूच्या दुकानाला अनुमती देण्यात आली आहे. मी लोकांना या दुकानाबाहेर ११ गायी बांधण्यास सांगितले आहे. त्यांना रोखण्याचे धाडस कोण करते, ते पाहू. आम्ही या गायींना दुकानाच्या बाहेरच खाऊ घालू आणि त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्थाही करू.
संपादकीय भूमिकामध्यप्रदेशात भाजपचेच सरकार असतांना मंदिराजवळ दारूची दुकाने असणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! |