‘अंनिस’ने दिलेले चमत्काराचे आवाहन मी स्वीकारतो ! – अतुल छाजेड, ज्योतिषाचार्य
पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेले ‘चमत्कारा’चे आवाहन मी स्वीकारले आहे. त्यांनी सांगेल त्या ठिकाणी केव्हाही मी येण्यास सिद्ध आहे, असे आवाहन येथील ज्योतिषाचार्य अतुल छाजेड यांनी २५ जानेवारी या दिवशी पुणे येथील पत्रकार परिषदेमध्ये दिले आहे.
ते म्हणाले, ‘अंनिस’ ही संस्था केवळ हिंदु धर्माच्या विरोधामध्ये कार्य करते. मुळात तेच समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवत आहेत. त्यांची भोंदूगिरी चालू आहे. ते नेहमीच हिंदु धर्म आणि संत, साधू यांंची अपकीर्ती करतात. त्यांची भोंदूगिरी उघडी पाडण्याकरिता मी हे आवाहन करत आहे. मी या आधीही त्यांना ‘चमत्कार’ करून दाखवतो, असे आवाहन दिले होते; परंतु त्यांनी त्याला काहीही प्रतिसाद दिला नाही.’’
संपादकीय भूमिकाअंनिसला चपराक ! अंनिसला याविषयी काय म्हणायचे आहे ? |