सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना वेळोवेळी केलेले मार्गदर्शन !
१. ‘तिसर्या महायुद्धाचा काळ जवळ येत आहे. ‘महायुद्धाच्या काळात आपण कुठे असू’, हे सांगता येत नाही. आपण आतापासून तळमळीने साधना केली, तर त्या काळातही देव आपले रक्षण करील !
२. आपण संतांची भेट होण्यासाठी प्रार्थना करतो. त्यांची भेट झाल्यावर आपण त्यांनी सांगितलेली साधना तळमळीने करून त्यांचा लाभ घ्यायला हवा !
३. नवरा-बायकोचे (मायेतील व्यक्तींचे) मन जिंकणे कठीण आहे. त्यामुळे आपण देवाचे मन जिंकण्यासाठी प्रयत्न, म्हणजे साधना करायला हवी !
४. काही साधकांना ‘गुरूंच्या छायाचित्रापेक्षा त्यांच्या पादुकांकडे पहावेसे वाटते’, हे त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे !
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले