माघ यात्रेसाठी लाखो भाविकांचे पंढरपूर येथे आगमन !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ३१ जानेवारी – माघ शुक्ल एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आतापर्यंत १ लाख भाविक आले असून भाविकांच्या संख्येत आणखी वाढ होत आहे.
६५ एकर परिसरात ४३५ प्लॉटचे वाटप झाले असून २२७ दिंड्या तेथे विसावल्या आहेत. २६ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या यात्रेच्या कालावधीत लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. ‘भाविकांच्या साहाय्यासाठी ४ ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे’, अशी माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
माघ यात्रा कालावधीत भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या असून चोरी रोखण्यासाठी वारकरी वेषात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, तर १२५ ‘सीसीटीव्ही कॅमेर्यां’च्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे.