वणी (जिल्हा यवतमाळ) येथून गायींची चोरी रोखण्यासाठी ठाणेदारास निवेदन !
वणी (यवतमाळ), ३१ जानेवारी (वार्ता.) – येथील राष्ट्रहित संवर्धन समितीने पोलीस ठाणेदारास वणी शहर आणि परिसर येथील गायींची चोरी रोखण्यासाठी निवेदन दिले. ५ गायींची चोरी झाल्याची माहिती गायींच्या मालकांनी समितीला दिल्याने हे निवेदन दिले. ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांनी कारवाईचे आश्वासनही दिले. यापूर्वीही गायींच्या चोरीची प्रकरणे घडली आहेत.
संपादकीय भूमिकानिवेदन देण्याची वेळ का येते ? पोलीस स्वतःहून त्यांचे कर्तव्य पार का पाडत नाहीत ? |