श्री श्री रविशंकरजी यांची सिद्धगिरी (कणेरी) मठ येथे ‘सुमंगलम् पंचमहाभूत’ लोकोत्सवाची पहाणी !
कोल्हापूर – ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकरजी यांनी प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या सिद्धगिरी (कणेरी) मठ येथे भेट देऊन २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होत असलेल्या ‘सुमंगलम् पंचमहाभूत’ लोकोत्सवाची पहाणी केली. आध्यात्मिक क्षेत्रातील दोन वंदनीय गुरुवर्यांच्या भेटीने अवघा सिद्धगिरी कणेरी मठ परिसर भारावून गेला. श्री श्री रविशंकरजी यांचा ३१ जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा प्रारंभ झाला असून ३१ जानेवारीला कोल्हापूर येथे महासत्संग आणि १ फेब्रुवारीला महारुद्र पूजा, असे कार्यक्रम होत आहेत.
‘सुमंगलम् पंचमहाभूत’ लोकोत्सव भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारा आणि पर्यावरण प्रबोधन करणारा महोत्सव ! – श्री श्री रविशंकरजी‘सुमंगलम् पंचमहाभूत’ लोकोत्सव हा भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारा आणि पर्यावरण प्रबोधन करणारा महोत्सव आहे. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना समवेत घेऊन प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी जे काम करत आहेत, ते प्रेरणादायी आहे, असे गौरवोद़्गार श्री श्री रविशंकरजी यांनी काढले. श्री श्री रविशंकरजी यांनी महोत्सव कालावधीत सर्व कार्यकर्त्यांना विविध उपक्रमांत सहभागी होण्याची विनंती केली. |