पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना जन्मठेप
महिलेचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण
गांधीनगर (गुजरात) – एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना गांधीनगर येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गेल्या १० वर्षांपासून बापू जोधपूर येथील कारागृहात आहेत. तेथे ते अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
वर्ष २०१३च्या प्रकरणात सत्र न्यायालयाने पू. बापू यांना जन्मठेप सुनावली आहे. ही महिला वर्ष २००१ ते २००६ या काळात पू. बापू यांच्या कर्णावती येथील आश्रमात रहात असतांना पू. बापू यांनी अनेकदा तिचे लैंगिक शोषण केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या गुन्ह्यातील अन्य ६ जणांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. यात पू. बापू यांच्या पत्नी लक्ष्मीबेन, त्यांची मुलगी, तसेच ४ शिष्य यांचा समावेश आहे.