कॅनडातील प्रसिद्ध गौरीशंकर मंदिराची तोडफोड
लिहिण्यात आल्या भारतविरोधी घोषणा !
ब्रॅम्पटन (कॅनडा) – येथील प्रसिद्ध गौरीशंकर मंदिराची तोडफोड करून मंदिराच्या भितींवर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्याची घटना घडली आहे.
कनाडा में टारगेट पर मंदिर, दीवारों पर बनाई हिंदू विरोधी पेंटिंग#Canada #HinduTemplehttps://t.co/hxDg8uI9ZQ
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) January 31, 2023
या घटनेविषयी कॅनडातील टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने निवेदन प्रसारित करून निषेध केला आहे. यात म्हटले आहे की, मंदिराची तोडफोड करण्यात आल्याने कॅनडामधील भारतियांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. आम्ही कॅनडा सरकारच्या अधिकार्यांकडे अशा घटनांविषयी चिंता व्यक्त केली आहे.
We strongly condemn defacing of Gauri Shankar Mandir in Brampton,a symbol of Indian heritage, with anti-India graffiti. The hateful act of vandalism has deeply hurt sentiments of Indian community in Canada. We have raised our concerns on the matter with Canadian authorities.
— IndiainToronto (@IndiainToronto) January 30, 2023
१. कॅनडामध्ये गेल्या वर्षी जुलैमध्येही एका मंदिरावर आक्रमण करण्यात आले होते. त्या वेळी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडा सरकारकडे अशा घटनांची योग्य प्रकारे चौकशी करण्याची मागणी केली होती. कॅनडामध्ये भारतीय वंशाचे ४ टक्के नागरिक रहातात.
२. कॅनडाच्या राष्ट्रीय आकडेवारी कार्यालयाच्या अहवालानुसार कॅनडामध्ये वर्ष २०१९ ते २०२१ या काळात धर्म, लिंग आणि वर्ण द्वेषांच्या गुन्ह्यांमध्ये ७२ टक्के वाढ झाली आहे. यामुळे अल्पसंख्यांकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (याविषयी अमेरिका किंवा युरोपीय देश तोंड उघडणार नाहीत; मात्र याच संदर्भात भारतावर खोटे आरोप करत टीका करत रहातील ! – संपादक)
संपादकीय भूमिकाकॅनडामध्ये खलिस्तान्यांच्या आतापर्यंतच्या कारवाया पहाता त्यांच्याकडूनच हे आक्रमण करण्यात आल्याचे नाकारता येत नाही ! कॅनडा सरकारचेही त्यांना छुपे समर्थन असल्याने या घटना थांबण्याची शक्यता नसल्याने भारत सरकारनेच आता या संदर्भात विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे ! |