बीबीसीने माहितीयुद्ध चालवले आहे ! – रशिया
‘बीबीसी न्यूज’च्या वादग्रस्त माहितीपटावर रशियाचीही टीका
मॉस्को (रशिया) – ‘बीबीसी न्यूज’ने बनवलेल्या वादग्रस्त माहितीपटात वर्ष २००२ मधील गुजरात दंगलीवरून तत्कालीन मुख्यमंत्री अन् विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. यावरून बीबीसीला विरोध केला जात आहे. भारताने या माहितीपटावर बंदी घातली आहे. या माहितीपटाच्या संदर्भात रशियानेही प्रतिक्रिया व्यक्त करतांना बीबीसीने माहिती युद्ध चालू केल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी अमेरिका आणि ब्रिटन यांनीही बीबीसीच्या माहितीपटावर टीका केली होती.
ये सूचना युद्ध छेड़ने का सबूत… मोदी पर BBC की डॉक्यूमेंट्री पर रूस ने दिया बड़ा बयान#Russia #India #Putin #PmModihttps://t.co/i7CDFD7zhK
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) January 30, 2023
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांना या माहितीपटाविषयी प्रश्न विचारण्यात आल्यावर त्या म्हणाल्या की, आमच्या भारतीय मित्रांनी यावर आधीच भाष्य केले आहे. बीबीसी विविध आघाड्यांवर माहितीयुद्ध चालवत असल्याचा हा आणखी एक पुरावा आहे. हे केवळ रशियाच्या विरोधात नाही, तर स्वतंत्र धोरणाचे पालन करणार्या इतर जागतिक शक्तीकेंद्रांच्या विरोधातही आहे. बीबीसी अनेकदा पत्रकारिता व्यवसायाच्या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष करते.