समलैंगिकता हा गुन्हा नाही ! – पोप फ्रान्सिस
व्हॅटिकन सिटी – समलैंगिकता हा गुन्हा नाही, असे विधान ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी एका मुलाखतीत केले आहे. त्यांनी कॅथॉलिक बिशप यांना समलैंगिकांचे चर्चमध्ये स्वागत करण्याचे आवाहन केले होते. यापूर्वी पोप यांनी समलैंगिकतेला गुन्हा ठरवणारा कायदा, म्हणजे अन्याय असल्याचे सांगत त्यावर टीका केली होती.
Pope Francis says homosexuality not a crime https://t.co/knOejSubUN
— ABC News (@abcnews) January 25, 2023
१. पोप यांनी म्हटले की, जेव्हा मी म्हटले होते की, समलैंगिकता एक पाप आहे, तेव्हा मी केवळ कॅथॉलिक नैतिक शिक्षणाचा उल्लेख करत होतो. या शिक्षणानुसार विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवणे, हे पाप आहे.
२. पोप यांनी पुढे असेही सांगितले की, जगातील काही भागांमध्ये कॅथॉलिक बिशप समलैंगिकतेला गुन्हा ठरवणार्या कायद्यांचे समर्थन करतात.