नंदुरबार येथील श्री. रामकुमार दुसेजा यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर दिलेला अभिप्राय
रामनाथी आश्रम पाहून पुष्कळच आनंद होणे
‘ईश्वराने मनुष्याला जे कार्य करण्यासाठी हा मनुष्य जन्म दिला आहे, त्याचे खरे रूप मला येथे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पहायला मिळाले. आज प्रत्येक घरातील पाच सदस्यही प्रेमाने एकत्र राहू शकत नाहीत. याउलट येथे आश्रमात अनेक जण निस्वार्थभावाने एकत्र राहून सेवा करत आहेत. धन्य आहेत ते जीव, जे आदर्श जीवन जगण्याची पद्धत शिकून स्वतःचे जीवन सफल करत आहेत. हे पाहून मला पुष्कळच आनंद वाटला.’
– श्री. रामकुमार दुसेजा, ५, गुरुनानक सोसायटी, नंदुरबार. (२२.११.२०२२)