पू. रेखाताई असती गुणरत्नांची खाण ।
पूजनीय रेखाताईंचे (टीप) हे सुसज्ज स्वयंपाकघर ।
रेखीव, सुरेख, सुंदर अन् साधकही तत्पर ।
खावयास येथे पदार्थ स्वादिष्ट अन् रुचकर ।। १ ।।
घंटो न् घंटे सेवेत रत, शिरी गुरुकृपेचा कर ।
ईश्वरी कृपेची आहे पहा, हीच खरी खूण ।
ताई आमुच्या असती गुणरत्नांची खाण ।। २ ।।
कार्य हे ईश्वरी मानूनी करिती अखंड सेवा ।
सर्वांशी समभावाने वागती ।
कुणी म्हणती या ताईस आईचे दुसरे रूप ।। ३ ।।
या वात्सल्यमूर्तीचे मज वाटे भारी अप्रूप ।
कर हे दोन्ही जोडून देवाकडे हेच मागणे ।
या अन्नपूर्णेस अक्षयपात्र तू द्यावेस ।। ४ ।।
टीप – सनातनच्या ६० व्या संत पू. रेखा काणकोणकर
– सौ. श्रावणी फाटक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
(२३.९.२०२२)