गोव्याची बाजू कायदेशीरदृष्ट्या भक्कम ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
म्हादई जलवाटप तंटा
पणजी, ३० जानेवारी (वार्ता.) – म्हादई जलवाटप प्रकरणी गोव्याची बाजू कायदेशीरदृष्ट्या भक्कम आहे. याची फलनिष्पत्ती लवकरच दिसून येणार आहे. म्हादईच्या संवर्धनासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बेळगाव येथील निवडणूक प्रचार सभेत ‘केंद्राने गोवा राज्याची संमती घेऊन म्हादईचे पाणी वळवण्यास कर्नाटकला मान्यता दिली’, असे विधान केले होते. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते.
Goa Government Won’t Compromise on Mahadayi Issue: CM Sawanthttps://t.co/1YldGEjXGw #goa_cm_pramod_sawant #mahadayi #Breaking_News #Featured #Politicshttps://t.co/1YldGEjXGw
— India24hourslive (@India24hoursliv) January 30, 2023
केंद्रीय गृहमंत्र्यांचा दावा अमान्य ! – जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर
पणजी – म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कर्नाटकला संमती देण्याविषयी केंद्राकडे कोणतीच चर्चा झालेली नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांनी म्हादईसंबंधी केलेले विधान आम्ही स्वीकारत नाही, असे मत जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केले.
Water war: Amit Shah never consulted Goa on Mhadei diversion, say BJP mantris https://t.co/1r7vsTTXmI
— The Times Of India (@timesofindia) January 31, 2023
ते पुढे म्हणाले, ‘‘म्हादईसंबंधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेले विधान आम्ही स्वीकारू शकत नाही; कारण अशा स्वरूपाची कोणतीही चर्चा केंद्राकडे झालेली नाही. म्हादईसंबंधी केंद्राकडे चर्चेच्या वेळी त्यांनी ‘दोन्ही ठिकाणची सरकारे आपलीच आहेत आणि दोन्ही राज्यांची आम्ही काळजी घेऊ’, असे म्हटले होते. केंद्रीय जल आयोगाने कळसा-भंडुरा प्रकल्पाला संमती दिलेली असली, तरी म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कर्नाटकला अजूनही अनेक खात्यांच्या अनुज्ञप्ती घ्याव्या लागणार आहेत. ही खाती पाणी वळवण्यासाठी मान्यता देणारच नाहीत, असा मला ठाम विश्वास आहे.’’
#mhadei|| CM Dr Pramod Sawant has reiterated that Goa is fighting a “strong” legal case for Mahadayi and govt is working to protect the river from being diverted by Karnataka.@DrPramodPSawant pic.twitter.com/WSBP0iP7hu
— Goa News Hub (@goanewshub) January 30, 2023
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विधान हे पाटबंधारे प्रकल्पांविषयी ! – नीलेश काब्राल
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आम्ही म्हादईचे पाणी वळवण्यास संमती दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा निषेध. आम्हाला न्यायिक मंच खुले आहेत : नीलेश काब्राल, सार्वजनिक बांधकाम मंत्री @nileshcabral #BreakingNews #MhadeiRiver pic.twitter.com/nKUU9Psyxc
— dainik herald (@dainikherald) January 30, 2023
पणजी – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी केलेली चर्चा म्हादईच्या संवर्धनासाठी होती, म्हादईचे पाणी वळवण्यासाठी नव्हती. म्हादईसंबंधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या विधानाचा मी निषेध करतो. मुख्यमंत्र्यांनी म्हादईचे पाणी वळवण्यासाठी अनुमती देण्याचा प्रश्नच येत नाही; कारण अशी चर्चा केंद्राकडे झालेलीच नाही. म्हादईचे पाणी खोर्यातून बाहेर नेण्यास आमचा विरोध आहे; मात्र हे पाणी खोर्यातच ते वापरत असतील, तर त्यास आमची हरकत नाही. म्हादई पाणी तंटा लवादाने कर्नाटकला पिण्यासाठी पाणी दिलेले आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विधान हे पाटबंधारे प्रकल्पांविषयीचे आहे.’’
♦ ‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा ♦