कोल्हापूरचा विकास करण्यासाठी सढळ हस्ते साहाय्य करू ! – नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री
कोल्हापूर – शहरातील शिवाजी पूल ते बास्केट ब्रिज हा रस्ता सिमेंटचा करू, आवश्यक तेथे उड्डाणपूल बांधू, कोल्हापुरात वाहननिर्मिती उद्योगासाठी पोषक वातावरण असल्याने कोल्हापूरला ‘ऑटोमोबाईल हब’ बनवू, सांगली-कोल्हापूर हा रस्ता सिमेंट-काँक्रिटचा करण्यासाठी निधी देऊ. कोल्हापूरचा विकास करण्यासाठी सढळ हस्ते साहाय्य करू, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. पंचगंगा नदीच्या तिरावरून शहरात प्रवेश करणार्या ‘बास्केट ब्रिज’चा पायाभरणी समारंभ आणि रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमीपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या प्रसंगी पालकमंत्री दीपक केसरकर, भाजप खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक, तसेच अन्य उपस्थित होते.