दैनिक ‘सनातन प्रभात’ची ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ गौरव विशेष पुरवणी’ वाचत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती
१. दैनिक ‘सनातन प्रभात’ची ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ गौरव विशेष पुरवणी’ वाचत असतांना हिना अत्तराचा सुगंध येणे
‘१४.१२.२०२२ या दिवशी रात्री घरी मी ७.१२.२०२२ या दिवसाच्या दैनिक ‘सनातन प्रभात’ची ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ गौरव विशेष पुरवणी’ वाचत होते. मी शेवटच्या पानापासून वाचण्यास आरंभ केल्यावर मला हळूहळू सुगंध येऊ लागला. मी आतील पान वाचण्यास चालू केल्यावर मला हिना अत्तराचा सुगंध येऊ लागला. त्यानंतर मी पहिल्या पानाचे वाचन करू लागल्यावर मला अधिक सुगंध आला.
२. आश्रमात होत असलेल्या यज्ञाच्या वेळी हिना अत्तराची आहुती दिल्यावर जसा सुगंध येतो, तसा सुगंध येणे आणि या सुगंधामुळे घरात प्रसन्न, आनंद आणि शांती जाणवणे
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात होत असलेल्या यज्ञाच्या वेळी हिना अत्तराची आहुती देतात, तेव्हा जसा सुगंध येतो, तसा सुगंध मला येत होता. तेव्हा माझ्या अंतर्मनात प्रसन्नता आणि आनंद जाणवत होता. त्या सुगंधामुळे मला घरात शांतता जाणवत होती. त्या वेळी माझी मनोमन परात्पर गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी प्रार्थना होऊ लागली. देवाने मला ही अनुभूती दिल्याबद्दल माझे अंतर्मन कृतज्ञतेने दाटून आले.’
– सौ. मीनल राजेंद्र शिंदे, फोंडा, गोवा. (१५.१२.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |