व्यायाम एकट्याने करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन करावा !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १४४
‘एखादी गोष्ट सातत्याने करण्याची सवय नसल्याने एकट्याने व्यायाम केल्यास काही दिवसांनी त्यामध्ये खंड पडू शकतो. व्यायामामध्ये खंड पडू नये, यासाठी घरातील सर्वांनी सर्वांच्या सोयीनुसार एखादी वेळ ठरवून एकत्र येऊन व्यायाम करावा. असे केल्याने व्यायामात सातत्य टिकून रहाते. आश्रमात रहाणार्या पूर्णवेळ साधकांनीही व्यायामाच्या वेळा ठरवून एकत्रितपणे व्यायाम केल्यास त्यांना ‘संघटितपणा’ हा गुण अंगी बाणवण्यास साहाय्य होईल.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१.२०२३)
प्रतिसाद द्या !
संपर्क : ayurved.sevak@gmail.com वर कळवा.