मराठी साहित्य संमेलनासाठी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात भूमीपूजन, तर विद्रोही साहित्य संमेलनासाठी नांगरणीद्वारे भूसन्मान !
९६ व्या मराठी साहित्य संमेलनावर विद्रोही साहित्यिकांची कुरघोडी !
वर्धा, ३० जानेवारी (वार्ता.) – येथे ३ फेब्रुवारीला आरंभ होणार्या ९६ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीला पुरोहितांच्या मंत्रोच्चारात भूमीपूजन करण्यात आले. त्यावर टीका करण्याच्या बहाण्याने ‘४ फेब्रुवारीला आरंभ होणार्या विद्रोही साहित्य संमेलनाला शेतकर्याकडून नांगरणी करून भूसन्मान (भूमीपूजन) करत प्रारंभ करत आहोत’, असे संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितेश कराळे यांनी सांगितले.
(मंत्रोच्चाराचे महत्त्व पाश्चात्त्यांनाही समजले आहे आणि त्याविषयी मोठ्या प्रमाणात संशोधनही केले जात आहे. निवळ ब्राह्मण आणि हिंदूंमधील चालीरिती यांच्याविषयी द्वेषापोटी अशा कृती करणारे विद्रोही समाजाला दिशा काय देणार ? – संपादक)