समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाळल्या ‘श्रीरामचरितमानस’च्या प्रती !
श्रीरामचरितमानसवर बंदी घालण्याची मागणी करणारे पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांचे केले समर्थन !
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथे ‘श्रीरामचरितमानस’च्या काही प्रती जाळून समाजवादी पक्षाचे ओबीसी महासभेचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांना समर्थन देण्यात आले. मौर्य यांनी यापूर्वी ‘श्रीरामचरितमानस’वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. समाजवादी पक्षाने मौर्य यांना पक्षाचे सरचिटणीस बनवले आहे.
OBC Mahasabha members burn copies of Ramcharitmanas in support of Samajwadi Party leader Swami Prasad Mauryahttps://t.co/Jfm0PIgghe
— OpIndia.com (@OpIndia_com) January 30, 2023
ओबीसी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, आम्ही ‘श्रीरामचरितमानस’मधील आक्षेपार्ह भागाच्या प्रती जाळल्या आहेत. यात नारी, शुद्र, दलित आणि ओबीसी समाज यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने आहेत. ती ‘श्रीरामचरितमानस’मधून काढून टाकणे आवश्यक आहेत. जेव्हा ती काढण्यात येतील, तेव्हाच आमचा विरोध मावळेल, अन्यथा ठिकठिकाणी विरोध चालूच राहिले.
विनाशकाले विपरीतबुद्धिः । – उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य
श्रीरामचरितमानसच्या प्रती जाळण्याच्या घटनेविषयी उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ट्वीट करून सांगिलते की, विक्षिप्त झालेल्या समाजवादी पक्षाने तिचे हिंदूविरोधी चरित्र उघड केले आहे. श्रीरामचरितमानसचा अवमान करणार्याला पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरचिटणीस बनवून पक्षाच्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकला आहे. याला ‘विनाशकाले विपरीतबुद्धिः ।’ (विनाशकाळ जवळ आल्यावर बुद्धी भ्रष्ट होते) असेच म्हणावे लागेल.
संपादकीय भूमिका
|