(म्हणे) ‘मी माझ्या मतदारसंघातील जुनी ३ मंदिरे पाडली होती !’ – द्रमुकचे नेते टी.आर्. बालू
तमिळनाडूतील द्रमुकचे नेते टी.आर्. बालू यांचा हिंदुद्वेष !
(द्रमुक म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ)
चेन्नई (तमिळनाडू) – माझ्या मतदारसंघातील जी.एस्.टी. मार्गावरील १०० वर्षे जुने श्री सरस्वती मंदिर, श्री लक्ष्मी मंदिर आणि श्री पार्वती मंदिर तोडण्यात आले. मीच ही तीनही मंदिरे तोडली. मला ठाऊक होते की, मला मते मिळणार नाहीत; मात्र मला हेही ठाऊक होते की, मते कशी मिळतील, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाचे नेते टी.आर्. बालू यांनी मदुराई येथील एका सभेत दिल्याचा व्हिडिओ भाजपकडून प्रसारित करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी बालू यांचा हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. सेतूसमुद्रम् प्रकल्पाच्या समर्थन सभेत ते बोलत होते.
“I demolished them knowing that I wouldn’t get the votes. But I also knew how to get the votes,” the MP reportedly is heard saying in the clip.#DMK #TRBalu | @PramodMadhav6 https://t.co/j7vQdRSDSV
— IndiaToday (@IndiaToday) January 29, 2023
१. या व्हिडिओमध्ये बालू यांनी मशिदीचाही उल्लेख केला आहे. तसेच मंदिर पाडल्याने अप्रसन्न झालेल्यांना लोकांना याहून मोठे मंदिर बांधून देण्याचे आश्वासन दिले आणि तसे मंदिरही बांधले, असेही बालू यांनी यात म्हटले आहे.
२. दोनच दिवसांपूर्वी बालू यांनी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांना स्पर्श करणार्याचे हात तोडण्याचीही धमकी दिली होती.
संपादकीय भूमिका
|