वर्ष २०२७ पर्यंत भारत जागतिक महाशक्ती बनेल ! – रमेश चिंतक, उपाध्यक्ष, इंडियन कौन्सिल फॉर ॲस्ट्रॉलॉजिक सायन्सेस
हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ‘इंडियन कौन्सिल फॉर ॲस्ट्रॉलॉजिक सायन्सेस’चे उपाध्यक्ष श्री. रमेश चिंतक यांची घेतली सदिच्छा भेट !
कानपूर (उत्तरप्रदेश) – वर्ष २०२७ पर्यंत भारत जागतिक महाशक्ती बनेल आणि वर्ष २०३१ पर्यंत भारतात सनातन धर्माचे राज्य निर्माण होईल, अशी ग्रहस्थिती बनली आहे. भारतात फार थोड्या संघटना आहेत, ज्या हिंदु राष्ट्रासाठी स्पष्टपणे कार्य करत आहेत, असे प्रतिपादन ‘इंडियन कौन्सिल फॉर ॲस्ट्रॉलॉजिक सायन्सेस’चे उपाध्यक्ष श्री. रमेश चिंतक यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १५ डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२३ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संपर्क अभियान राबवण्यात आले. या काळात हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी श्री. चिंतक यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी श्री. चिंतक यांचा शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी त्यांना समितीच्या कार्याचा परिचय करून देण्यात आला, तसेच ‘हलाल अर्थव्यवस्थे’विषयी सविस्तर माहिती देण्यात आली. याप्रसंगी समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी अन् समितीचे कानपूर समन्वयक श्री. प्रशांत वैती उपस्थित होते.