जमशेदपूर येथील बालसाधक चि. चैतन्य कृष्णा याला ‘हॉर्स रायडिंग शो’मध्ये सुवर्णपदक प्राप्त !
जमशेदपूर (झारखंड) – ‘टाटा स्टील’च्या वतीने १४ जानेवारी या दिवशी आयोजित केलेल्या ‘हॉर्स रायडिंग शो’मध्ये सनातनचा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा बालसाधक चि. चैतन्य कृष्णा (वय ७ वर्षे) याने ‘ज्युनिअर ग्रुप’च्या एका कार्यक्रमामध्ये सुवर्णपदक मिळवले, तसेच त्याच्या गटातून ‘बेस्ट रायडर’ची ट्रॉफी (पारितोषिक) प्राप्त केली आहे.
चि. चैतन्य हा सनातनचे श्री. बी.वी. कृष्णा आणि सौ. अश्विनी कृष्णा यांचा मुलगा आहे. याप्रसंगी ‘टाटा स्टील लिमिटेड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रबंध संचालक श्री. टी.व्ही. नरेन्द्रन् यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.