चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथे अवैध वाहतुकीत गायींना कोंबल्यामुळे एका गायीचा मृत्यू !
१२ गायींची सुटका
जळगाव – चाळीसगाव ते नांदगाव रस्त्यावरील खडकी बुद्रुक गावाजवळ नांदगावकडून चाळीसगावकडे जाणार्या ‘बोलेरो’ या वाहनातून गोवंशियांची अनधिकृत वाहतूक होत आहे, ही माहिती मिळताच जमावाने वाहन अडवत वाहनातील गायींची सुटका केली; पण नंतर अज्ञातांनी हे वाहन पेटवून दिले. २६ जानेवारीच्या रात्री ही घटना घडली. अंधार असल्याने चालक पळून गेला.
पोलिसांनी जळीत बोलेरो वाहनासह ११ गायी कह्यात घेतल्या आहेत. गाडीत गायी कोंबल्यामुळे १२ गायींपैकी एका गायीचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोवंशियांची वाहतूक करणार्या अनोळखी व्यक्तींविरोधात चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. गायींना येथील गोशाळेत पाठवले आहे.
संपादकीय भूमिकागोहत्याबंदी कायदा लागू असतांनाही गोवंशियांची अनधिकृत वाहतूक होतेच कशी ? कायदा-सुव्यवस्थेला न जुमानणार्यांच्या विरोधात कठोर कारवाईच व्हायला हवी ! |