पुणे येथे शाळकरी मुलींसमवेत अश्लील कृत्य करणार्या क्रीडा शिक्षकाला अटक !
पुणे – शाळकरी मुलींसमवेत अश्लील कृत्य करणार्या अविनाश चिलवेरी यांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. ते कोंढवा येथील महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळेत क्रीडा शिक्षक आहेत. या प्रकरणी एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी शाळेतील ४-५ विद्यार्थिनींना सामाजिक माध्यमातून संदेश पाठवले. त्यांच्यासमवेत अश्लील कृत्य केले.
शाळेत एका स्वयंसेवी संस्थेकडून विद्यार्थिनींच्या समुपदेशनासाठी नुकताच एक कार्यक्रम राबवण्यात आला होता. या कार्यक्रमात शाळकरी मुलींना चांगला स्पर्श, तसेच वाईट स्पर्श यांविषयीची माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलींनी चिलवेरी यांनी अश्लील कृत्य केल्याची माहिती समुपदेशकांना दिली. (विद्यार्थिनींच्या समुपदेशनासाठी असे कार्यक्रम शाळांमध्ये वारंवार घेणे आवश्यक आहे, हे यातून सिद्ध होते. – संपादक)
संपादकीय भूमिका
|